समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या मृत व्यक्तींमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीचा ही समावेश आहे. या अपघाता 23 जण जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाणाला गेले होते आणि येथून परतत असताना हा अपघात झाला आहे. हा अपघता वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली.
या घटनेची माहिती मिळात पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातातील जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडला आहे. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 30 प्रवासी होते. हे सर्व जण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाच्या दर्शन करून नाशिकला परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
वैजापूर तालुक्यातील जांबरगवा टोल नाक्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावताील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातातील जखमी झालेल्या सर्वांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या घटनास्थळी समृद्ध महामार्गावरील बचाव पथक वैजापूर पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.
