Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

गौरी – गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पुणे : शिवसेना व स्व.गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने घरचा गौरी-गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात होती. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रतिष्ठाणच्या सचिव प्रियांका चौधरी-दरगुडे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात महिलांनीच पुढाकार घेऊन कशाप्रकारे त्यावर मात करता येते व आपण स्वतः कसे सक्षम व्हावे असे सांगितले. तसेच महिलांसाठी केंद्र सरकारने ३३% आरक्षण मंजुर केले त्याबद्दल मार्गदर्शन करून केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

तसेच प्रतिष्ठाण मार्गदर्शक राजाभाऊ चौधरी यांनी बोलताना प्रतिष्ठानच्या अनेक योजनांची माहिती दिली तसेच ३३% आरक्षण मंजुर झाल्यामुळे महिलांना संधी उपलब्ध होणार आहे तरी त्यांनी सामाजिक उपक्रमा मध्ये सहभाग घेतला पाहिजे असे सांगितले व येणाऱ्या काळात प्रतिष्ठाण च्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. गणपती सजावटी साठी प्रथम क्रमांक ११०००/-रु रोख व सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक ७०००/-रोख व सन्मान चिन्ह वतृतीय क्रमांक ५०००/-रोख व सन्मान चिन्ह तसेच गौरी सजावटी साठी प्रथम क्रमांक ९०००/-रु रोख द्वितीय क्रमांक ७०००/-रोख व तृतीय क्रमांक ५०००/-रु रोख तसेच सहभागी प्रत्येक महिलेस सन्मान चिन्ह व साडी देण्यात आली.

यावेळी निवृत्त डी .वाय.एस.पी. प्रभाकर शिंदे, निवृत्त शिक्षणाधिकारी दहीफळे साहेब,माजी सैनिक संपत जाधव, राजेंद्र जैन, सेठिया साहेब, सुरेश कुलकर्णी, वरपे मॅडम, कोंडलकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी नातु यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष दौलत चौधरी व मित्र परिवार यांनी केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading