दिल्लीत सर्वोत्कुष्ट गोल्फ रिसोर्स चा सन्मान ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टला
पुणे : देशभरातील आणि जागतिक मान्यवरांच्या उपस्थितीत यावर्षीचा सर्वोत्कृष्ठ गोल्फ रिसोर्स चा सन्मान पुण्यातील गोल्फ खेळाडूसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टला दिला गेला .रिसोर्स चे संचालक अनिल सेवलेकर यांना रिचर्ड वॉलनेर यांच्या हस्ते दिल्ली (गुरगांव ) येथील गोल्फ आणि टर्फ शिखर परिषद 2023 मध्ये नुकताच प्रदान करण्यात आला .या परिषदेचे आयोजन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन च्या वतीने करण्यात आले होते .
दिल्ली गुरगाव येथे आयोजित गोल्फ आणि टर्फ समिट 2023 च्या पहिल्या दिवशी जगभरातील मान्यवरांनी सहभाग घेतला, इंडस्ट्री सहयोग, व्यवसाय नेटवर्किंग, उत्पादन नावीन्य, गोल्फच्या जगात शैक्षणिक प्रगती यावर प्रकाश टाकला.
या शिखर परिषदेत महिला गोल्फ असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा कविता सिंग ,भारतीय गोल्फ युनियन (IGU) चे अध्यक्ष ब्रिजंदर सिंग ,माईक सेबॅस्टियन (सीईओ, एशियन गोल्फ सिंगापूर) ,आकाश ओहरी (व्यवस्थापकीय संचालक, डीएलएफ), ब्रूस मॅकफी (एएसटीएमए), विनोद गोयल (अॅग्रीकेअर) आणि गॅरेथ नाइट (टोरो)
