Monday, October 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा – राज्यपाल रमेश बैस

मुंबई  : “सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहोचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविले पाहिजे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.

विधानभवन प्रांगणात ‘योगप्रभात @ विधानभवन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यपाल आपले विचार व्यक्त करीत होते. मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार मनीषा कायंदे, आमदार संजय कुटे, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

योगामुळे आत्मविश्वास, सहनशक्ती वाढीस लागत असल्याचे सांगत राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, योगाचा संपूर्ण जगात प्रचार झाला पाहिजे, नव्या पिढीला योग शिकविणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे सामर्थ्य योगात आहे. देशात मधुमेह वेगाने वाढत आहे. या आजारावर योगाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. भारत सर्वाधिक युवाशक्तीचा देश आहे. युवाशक्तीने योग केला पाहिजे. ही योग चळवळ पुढे नेली पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना योगामुळे व्यसनांपासून दूर राहता येऊ शकते. देशात योग विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तणावमुक्तीसाठी प्रत्यके कार्यालयात किमान १५ मिनिटे योगाभ्यास झाला पाहिजे”.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading