Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

टिफीन बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी लुटला वैचारिक मेजवानीचा आनंद

पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आज कोथरूड मध्ये माजी खासदार प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टिफीन बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी वैचारिक मेजवानीचा आनंद लुटला.

आज भाजपा कोथरुड मंडलाच्या वतीने वृंदावन बॅंक्वेट येथे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर, माजी खासदार अमरजी साबळे, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या टिफीन बैठकीत सहभागी झाले होते. प्रत्येकांनी आपापल्या घरातून टिफीन आणून, सर्वांसह जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच, माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील लोकोपयोगी योजनांसह अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हे एक कुटुंब आहे. लाखो कार्यकर्त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहे. २०१४ साली देशात माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात एक नवीन पर्व सुरू झाले. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजनांमुळे देशातील सर्व जनता माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा काळ सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व म्हणून घोषित केला आहे.भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. टिफीन बैठक त्यापैकीच एक असून, टिफीन बैठकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आपापल्या घरून आणलेल्या जेवणाच्या टिफिनमधील पदार्थांच्या देवाण-घेवाणीसह माननीय मोदींजींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करत आहेत. 

प्रकाश जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नऊ वर्षांच्या काळात गरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम आणि योजना राबविल्या.मोदीजींच्या नेतृत्वातील लोककल्याणकारी योजना ज्या भागात पोहोचल्या नसतील; त्या भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत‌. आगामी काळ हा निवडणुकांचा काळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीकोनातून ही तयार राहिले पाहिजे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading