Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

आधुनिक कवितेने संस्कृती समृद्ध करावी : डॉ. बाबूल पठाण

पुणे : अक्षम समाजघटकांना आत्मविश्वास देऊ करण्याची क्षमता कवितेत असते. नवकवितेने समाज परिवर्तनाचे भान ठेवणे आवश्यक आहे. मने एकसंध राहावी यासाठी कवितेच्या रूपातून मोठे कार्य करता येते. आधुनिक कवितेने संस्कृती समृद्ध करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. बाबूल पठाण यांनी व्यक्त केली. आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी या वेळ ी दिली.

करम प्रतिष्ठानच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात कवयित्री चिन्मयी चिटणीस यांच्या ‌‘स्वप्नांचे प्रहर‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. पठाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, प्रकाशक दास पाटील, वर्षा कुलकर्णी, प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्याबरोबरच विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, कविसंमेलन, गझल संमेलन, प्रतिष्ठित साहित्य संस्थाचालकांचे सत्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कवयित्री चिन्मयी चिटणीस म्हणाल्या, करम प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन सोहळ्यात माझ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले याचा खूप आनंद आहे. कवयित्री ही तिच्या काव्याची आई असते आणि तिच्या कवितांचा संग्रह हे तिचे अपत्यच असते. हे कवितासंग्रहरूपी अपत्य खूप छान आहे. प्रकाशक दास पाटील यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील गोष्ट उलगडली.

वर्धापनदिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रज्ञा महाजन आणि वर्षा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात भूषण कटककर यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. वासंती वैद्य, निरूपमा महाजन यांच्या हस्ते स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले. ॲड. प्रमोद आडकर, जोत्स्ना चांदगुडे व शिरीष चिटणीस यांची विशेष उपस्थिती होती.

कविसंमेलनात चंचल काळे, अश्विनी जगताप, कांचन सावंत, आरती देवगांकवर, डॉ. दाक्षायणी पंडित, वंदना लोखंडे, डॉ. राजेंद्र माने, मानसी चिटणीस, प्रतिभा मगर यांचा तर गझल संमेलनात वैशाली माळी, मिलिंद छत्रे, शाम खामकर, प्राजक्ता पटवर्धन, सुजाता पवार, डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. अमिता गोसावी, स्वाती यादव, उर्मिला सहस्त्रबुद्धे–वाणी, शिवाजी सुतार यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता भुजबले आणि प्राजक्ता वेदपाठक यांनी केले तर आभार चंचल काळे आणि वैशाली माळी यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading