10 वी मध्ये 92 टक्के तरी 12 वीच्या निकालासाठी जाव लागलं न्यायालयात
मुंबई : नाशिकच्या एका विद्यार्थ्याने आयसीएसई बोर्डात दहावीमध्ये 92 टक्के गुण मिळवले. अन् बारावीसाठी विज्ञान शाखेची निवड केली. राज्य शिक्षण मंडाळामधून इयत्ता बारीवीची परिक्षा देखील दिली. मात्र बोर्डाने त्याचा निकाल थांबवला. या विरोधात संबंधीत विद्यार्थी न्यायालयात गेला. अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला खडे बोल सुनावत या विद्यार्थ्याचा निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय आहे?
बार अँन्ड बँचने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिकच्या एका विद्यार्थ्याने आयसीएसई बोर्डात दहावीमध्ये 92 टक्के गुण मिळवले आहेत. पुढील शिक्षणासाठी त्याने विज्ञान शाखेची निवड केली. तसेच त्याने बारावीची राज्य शिक्षण मंडाळाची परीक्षा देखील दिली. पण जेव्हा बारावीचा निकाल लागला तेव्हा बोर्डाने त्याचा निकाल देण्यास नकार दिला. यावर विचारणा केली असता अशी माहिती कळाली की, या विद्यार्थ्याने दहावीमध्ये असताना विज्ञान हा विषय घेतला नव्हता. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या नियमानुसार तो बारावीसाठी विज्ञान शाखेची निवड करू शकत नाही. मात्र, या विद्यार्थ्याने तर बारावीसाठी विज्ञान शाखेला प्रवेश घेवून परिक्षाही दिली होती. यापार्श्वभूमीवर संबंधीत विद्यार्थी न्यायालयात गेला. नुकतेच या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला खडसावले
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, दहावीमध्ये विद्यार्थ्याने जर विज्ञान विषय घेतला नाही तर त्याला पुढेही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेता येणार नाही, या नियमामध्ये आम्हाला कोणताही तर्क वाटत नाही. खरंतर 10 मध्ये नाही तर 8 आणि 9वी मध्येच विद्यार्थ्यांना विषय निवडावे लागतात. त्यामुळे चौदा वर्षांचं मूल त्याच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय घेईल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
