Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

श्री.सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ची रविवारी होणारी वार्षिक सर्वसासाधारण सभा बेकायदेशीर

पुणे : तमाम लोकांस कळविण्यात येते की, श्री.सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे पत्ता: क्षत्रिय भवन, ५७६, गुरुवार पेठ, पुणे ४११०४२, ४९७/ ९८, घोरपडे पेठ, स्वारगेट कॉर्नर, पुणे ४२. ही नोंदणीकृत संस्था असून तिचा नोंदणी क्र. A/ 16 असून सदर संस्थेची वार्षिक सर्वसाधरण सभा दि. १४/५/२०२३ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, अग्निशामन दलाच्या मागे, पुणे ४२ येथे संपन्न झालेली आहे. असे असताना श्री.सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणेचे स्वयंघोषित कार्यकारणी अध्यक्ष विनेश प्रकाश झाड व इतर यांनी रविवार दि. ११ जून २०२३ रोजी वाळवेकर लॉन्स, पुणे सातारा रोड येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सदरची सभा ही बेकायदेशीर आहे, अशी माहिती ॲड. भारत सदाशिव पाचारणे यांनी जाहीर नोटिस द्वारे दिली. 

या नोटिस मध्ये म्हटले आहे की, सदरची सभा घेणारे स्वयंघोषित अध्यक्ष . विनेश प्रकाश झाड व त्यांचे कार्यकारणी मेघशाम मोतीराम झाड, मनोज मनोहर काटवे, मोनाली मनीष खेरुड, योगेश विजय साधू, अंजली निलेश खत्री, दत्तात्रय रामचंद्र धोंडाळे, गणेश किरण खानापुरे, अजय नंदकुमार चौधरी, ऋषिकेश राजू कोल्हापुरे, किरण देविदास बुरबुरे, आकाश अंकुश कोल्हापुरे, आदित्य जितेंद्र झाड, शुभांगी प्रवीण वाळवेकर व अनुराधा योगेश चव्हाण यांच्या विरुध्द संस्थेने धर्मादाय सह.आयुक्त पुणे यांचेकडे अर्ज क्र. ६४/२०२२ दाखल केला होता, त्याचा निकाल संस्थेच्या बाजूने झालेला असून त्यामध्ये स्वयंघोषित कार्यकारणी विरुध्द मे.कोर्टाने मनाईचे आदेश केलेले असतानाही स्वयंघोषित कार्यकारणीने आदेशाचा अवमान केला म्हणून त्याची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे व स्वयंघोषित कार्यकारणी विरुध्द मनाईचे आदेश असतानाही त्यांनी बेकायदेशीर सभा आयोजित केली आहे. ती कायदेशीर नाही व सदरच्या सभेस समाजबांधव व समाजहितचिंतक यांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता दि. ११/६/२०२३ रोजीचे होणाऱ्या सभेस कोणीही उपस्थित राहू नये. यासाठी संस्थेच्या वतीने आवाहन करीत आहे व यासाठी सदरची नोटीस जाहीर करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading