जाधवर इन्स्टिटयूटस्तर्फे ४ था कीर्तन महोत्सव रविवारपासून
पुणे : शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे प्रबोधनाकरीता न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे चौथ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन दिग्गज कीर्तनकार कीर्तन करणार असून दिनांक ४ ते ६ जून दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात कीर्तन होणार असल्याची माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
कीर्तन महोत्सवाचे उद््घाटन रविवार, दिनांक ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत हरिपाठ होणार असून रविवारी, सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. प्रविण महाराज लोळे यांचे कीर्तन होणार आहे. दुस-या दिवशी सोमवारी सायंकाळी ७ वाजता कुट अभंग विवेचक ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे. यंदाचा कीर्तनकेसरी पुरस्कार महादेव महाराज राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवाचा समारोप मंगळवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाची सांगता दुपारी १२ ते २ यावेळेत महाप्रसादाने होणार आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या चौथ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात. https://youtube.com/c/ JadhavarGroupAdvShardulraoSudh akarraoJadhavar या लिंकवरुन कीर्तनांचा विनामूल्य आनंद घेता येईल.
