Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

क्रेडाईच्या प्रयत्नांना अखेर यश – रणजित नाईकनवरे

पुणे : बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर आता वेगळ्या एनए परवानगीची आवश्यकता नसल्याचा निर्णय महसूल विभागाने नुकताच जाहीर केला. या निर्णया संदर्भात गेली ५-६ वर्षे क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आम्ही पाठपुरावा करीत होतो. आमच्या या प्रयत्नांना आज यश आले आहे, अशी प्रतिक्रिया क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी व्यक्त केली.

रणजित नाईकनवरे म्हणाले, जमीन विकत घेतल्यानंतर बांधकाम सुरू करेपर्यंत एनएसाठी विकासकांना अनेक परवानग्या घ्याव्या लागायच्या. यामुळे जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष विकासकामाला सुरुवात होणे, यामध्ये किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी जायचा. मात्र, बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर आता कोणत्याही वेगळ्या एनए परवानगीची आवश्यकता नसल्याचा निर्णय महसूल विभागाने घेतल्यामुळे एकूणच या परवानग्या लवकर मिळणे आता शक्य होईल.

पुढे बोलताना ते म्हणाले, या निर्णयाने आधी असलेली क्लिष्ट अशी परवानगी प्रक्रिया सुलभ आणि जलद होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता ज्या जमिनी प्रस्तावित किंवा प्रचलित विकास आराखड्यात बांधकाम परवानगी प्राप्त असतील, गावाच्या हद्दीच्या २०० मीटरच्या आत असतील अथवा औद्योगिक प्रयोजनांसाठी असतील त्यांना वेगळ्या एनए मंजुरीची गरज लागणार नाही. या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यावेळी होणारी नोंदणी ही डिजिटल असणार आहे. या नोंदणीसाठी विकासकांना आणखी वेगेळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. आता बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पाला लागणारा वेळ कमी झाल्याने ग्राहकांना मिळणाऱ्या किंमतीमध्ये देखील निश्चितच फरक पडणार आहे. हा निर्णय घेतल्याने आम्ही राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख सचिव डॉ. नितीन करीर यांचे आम्ही आभारी आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading