Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

PMP – एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल

 बसमार्ग क्र. २६ – धनकवडी ते शिवाजीनगर मार्ग पूर्ववत सुरू होणार
 बसमार्ग क्र. ५०, ८८ व ३७६ या तीन बसमार्गांचा विस्तार
 बसमार्ग क्र. ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन या बसमार्गात बदल
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. २६ – धनकवडी ते शिवाजीनगर (मार्गे- स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड) हा बसमार्ग पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. तसेच बसमार्ग क्र. ५०, ८८ व ३७६ या तीन बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे करण्यात येत आहे. हे सर्व बदल दि. २५/०५/२०२३ पासून करण्यात येणार आहेत.

बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे

– मार्ग क्रमांक २६ – धनकवडी ते शिवाजीनगर
– मार्गे – स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड, बस संख्या – २,  वारंवारिता – ५५ मिनिटे
– मार्ग क्रमांक ५० – शनिवारवाडा ते सिंहगड पायथा
 या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिवार वाड्यापर्यंत करण्यात आला आहे.
 बस संख्या – ४, वारंवारिता – ५० मिनिटे
 मार्ग क्रमांक ८८ – अप्पर ते मेडी पॉईंट
 या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे अप्पर डेपो पर्यंत करण्यात आला आहे.
 बस संख्या – २,  वारंवारिता – १ तास १० मिनिटे
 मार्ग क्रमांक ३७६ – मनपा भवन ते पिंपरीगाव
 या मार्गाचा विस्तार मासुळकर कॉलनी च्या पुढे पिंपरी गाव पर्यंत करण्यात आला आहे.
 बस संख्या – २,  वारंवारिता – १ तास ३० मिनिटे

 मार्ग क्रमांक ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन
 या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे
करण्यात आला आहे.
 बस संख्या – २,  वारंवारिता – १ तास ३० मिनिटे
वरीलप्रमाणे प्रवाशांच्या मागणीनुसार व सोयीसाठी दि. २५/०५/२०२३ पासून बसमार्ग सुरू करण्यात येत असून या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरीक व रूग्ण यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading