fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

‘फ्रीमेसनरी’ या संघटनेबद्दल धूसरता कमी करण्यासाठी ‘ओपन हाऊस’चे आयोजन

पुणे : ‘फ्रीमेसनरी’ या संघटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. येत्या रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० ते सायं ५ दरम्यान कॅम्प परिसरात पुणे रेस कोर्स जवळील ६ ए एक्झिबिशन रस्त्यावरील फ्रीमेसनरी हॉलमध्ये हे ओपन हाऊस होणार असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

इंग्लंडच्या युनायटेड ग्रँड लॉजच्या अंतर्गत दी लेस्ली विल्सन लॉज नं ४४८० यांच्या वतीने सदर ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले असून फ्रीमेसनरी संघटने संदर्भात सकाळी १०.३०, दुपारी १ आणि ३.३० या वेळेत ओपन हाऊस दरम्यान उपस्थितांना संघटनेचे व्यवस्थापन व कामकाजा संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

या विषयी अधिक माहिती देताना डेप्युटी- डिस्ट्रीक्ट ग्रँड मास्टर असलेले देवेश हिंगोरानी म्हणाले, “फ्रीमेसनरी संघटनेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने आम्ही या ओपन हाऊसचे आयोजन केले असून या वेळी सामान्य नागरिकांना लॉजच्या परिसरात प्रत्यक्ष फेरफटका मारता येईल. इतकेच नाही तर फ्रीमेसनरी संघटना व ते वापरत असलेली सूचक चिन्हे व आजच्या काळातील त्यांचे संदर्भ या बद्दलही यावेळी माहिती देण्यात येईल.”

यासोबतच एका आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असून यामध्ये हिमोग्राम, एस क्रिएटनीन, एचबीए१सी, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन (पीएसए) व इंटरनॅशनल प्रोस्टेट सिम्पटम्स स्कोअर (एमओयु१) यांसाठी आवश्यक रक्त चाचण्या करण्यात येतील, असेही हिंगोरानी यांनी सांगितले. याबरोबरच शहरातील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ अमोल तलौलिकर आणि अॅलर्जिस्ट, इम्युनोलॉजिस्ट असलेले डॉ हिमांशू बापट हे देखील नागरिकांना आवश्यक तो सल्ला देण्यास उपलब्ध असणार आहेत. या शिबीराचा फायदा संघटनेतील सभासद व त्यांच्या कुटुंबासोबतच सामान्य नागरिकही घेऊ शकतील.

सदर आरोग्य शिबिरात होणाऱ्या तपासण्या या सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत असून इतरांसाठी रु. १०० इतके नगण्य शुल्क आकारले जाणार असल्याचे हिंगोरानी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading