श्रीमन छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा – 27 मे ते 6 जून 2023 दरम्यान आयोजन
पुणे:श्रीमन छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा वर्ष 10 वे, 27 मे ते 6 जून 2023 दरम्यान किल्ले शिवनेरी ते रायगड दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षांपासून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून पालखी सोहळ्याचे ध्येय व उद्दिष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणे, शिवचरित्राचा प्रसार करणे, शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम ,त्यांनी रयतेसाठी केलेले कार्य ,त्याकाळात रयतेसाठी राबवलेल्या विविध योजना अशी अनेक प्रकारची माहिती देण्यात येणार आहे.
10 वर्षांपासून सुरू झालेल्या शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे श्रीमन छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्यात 3 वर्षे कोरोना नियमांचे पालन करत हा उपक्रम रद्द करण्यात आला होता यावर्षी पालखी सोहळ्याचे 7 वे वर्षे असून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर ,दुष्काळग्रस्तांसाठी एक मूठ धान्य ,वृक्षारोपण व वृक्ष वाटप, हृय तपासणी असे अनेक उपक्रम राबिविले जातात या पालखी सोहळ्यात आपला मोलाचा सहभाग नोंदवावा असं देखील आवाहन करण्यात आलं आहे
27 मे रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान किल्ले शिवनेरीवरून विविध शिवभक्तांच्या उपस्थितीत
शिवमूर्तीचे पूजन करून पालखीचे प्रस्थान होणार आहे
तर संध्याकाळी नारायणगाव मुक्ताबाई समाज मंदिर येथे मुक्काम असणार आहे
28 मे रोजी नारायणगाव येथून पालखीचे प्रस्थान होऊन संध्याकाळी धाडगे मळा ,चाकण येथे मुक्काम असणार आहे
29 मे रोजी चाकण येथून प्रस्थान होऊन लांडेवाडी भवानी मंदिर येथे मुक्काम असणार आहे
30 मेला पालखी चाकण येथून प्रस्थान होऊन लालमहाल पुणे येथे मुक्काम असणार आहे
31 मे रोजी लालमहाल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आऊसाहेबांना अभिवादन पालखी दर्शन ,सायंकाळी 5 वाजता शाहीर हिंगे लोककला प्रबोधनीच्या वतीने शाहिरांची पोवाडा मानवंदना व 6 वाजता शिवधनुष्य पुरस्कार वितरण सोहळा व महाआरती होणार आहे
1 जून रोजी लालमहाल कसबा गणपती येथून संध्याकाळी भैरवनाथ मंदिर येथे मुक्कामासाठी असणार आहे
2 जून रोजी खानापूर येथून प्रस्थान व केळद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मुक्काम असणार आहे
3 जून रोजी श्रीराम मंदिर दहिवड येथे मुक्काम असणार असून 4 जून रोजी महाड रायगड भालेकर कोंडी ,किंजलोली येथे मुक्काम असणार आहे
5 व 6 जून रोजी पालखी सोहळा हा शिवराज्याभिषेक सोहळा येथे सहभाग घेणार आहे
सदर पालखी सोहळ्याचे शिवनेरी पासून रायगड पर्यंत गावागावात स्वागत होणार असून विविध सामाजिक उपक्रम घेऊन अनेक शिवभक्त देखील सामील होणार आहेत
श्रीमन छत्रपती शिवाजी महाराज पालखी समिती सोहळ्यात सामील होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे
संपर्क-8149123947,9890366011,9021495076
