Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

नवले पुलावर होणाऱ्या अपघाताबाबत लोकजागृती आणि सक्षम उपाय योजना करावी – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

पुणे : ज्या प्रकारे शिंदेवाडी गावामध्ये नैसर्गिक आपत्तीसंदर्भात लोकांना तात्काळ माहिती व्हावी, यासाठी ध्वनिक्षेपक यंत्र बसविण्यात आले होते त्याच प्रमाणे नवले पूल हा अपघात प्रवण भाग आहे. या दृष्टिकोनातून ध्वनिक्षेपक यंत्राद्वारे लोकजागृती करण्यात यावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महसूल विभागाला या पत्राद्वारे केल्या आहेत.
त्या म्हणतात, “पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघात होत आहेत. शासकीय आकडेवारीनुसार नवले पुलाच्या परिसरात गेल्या पाच वर्षात ४९ मोठे अपघात होऊन त्यात ५४ नागरिकांना मोठ्या प्रमाणात जीव गमावावा लागला आहे.

शासनाने अनेक उपाययोजना करून देखील या ठिकाणच्या अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. नवले पुला अगोदर किंवा बोगद्याच्या अगोदर पुर्वी ज्या प्रकारे दरडी कोसळणे, पाणी साठणे या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात शिंदेवाडी गावात ध्वनिक्षेपक यंत्र बसविले होते त्याच धर्तीवर नवले पुल हा अपघात प्रवण भाग आहे या दृष्टिकोनातून लोकांच्यात जागृती करण्याबाबत पावले उचलावीत.”

हा परिसर अपघातमुक्त करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आग्रह धरला आहे.

नवले पूल येथील वारंवार होणाऱ्या अपघातासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत १५ मे, २०२३ रोजी झालेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात देखील नवले पुलावरील होणारे अपघात थांबविण्यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी सरकारने याबाबत समिती नेमली होती. यापूर्वी केलेल्या सूचनांची प्रशासनाने दखल घेतली त्याबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाचे आभार मानले. आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading