Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

बडोदा बीएनपी परिबा म्युच्यूअल फंडातर्फे एनएफओ- बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड

पुणे  : मुल्याधारित गुंतवणूक धोरणांतर्गत बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त समभाग योजना प्रकारात बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड हा नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणल्याची घोषणा केली. दीर्घकालीन गुंतवणूक कालावधीचा दृष्टीकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणे, हा या फंडाचा उद्देश आहे. तब्बल २१ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले शिव चनानी (वरिष्ठ फंड व्यवस्थापक) यांच्याव्दारे या फंडाचे व्यवस्थापन केले जाणार असून निफ्टी ५०० इंडेक्स हा या फंडासाठी आधारभूत निर्देशांक राहणार आहे. एनएफओ १७ मे २०२३ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला असुन तो ३१ मे २०२३ रोजी बंद होईल.

मूल्य गुंतवणुकीच्या तत्त्वांचा वापर करून निवडलेल्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. समभागांचे मूलभूत मुल्य आणि प्रचलित बाजारभाव यांच्यातील तफावतीमुळे निर्माण झालेल्या संधी हा फंड हेरणार आहे. या संधी ओळखण्यासाठी हा फंड बाजारात सवलतीच्या दरपातळीवर असणाऱ्या समभागांचा शोध घेईल, तसेच त्यांची स्वतःची ऐतिहासिक सरासरी पातळी अथवा मूलभूत मूल्यांच्या तुलनेत या पातळीचा विचार गुंतवणूकीवेळी करणार आहे.

सदर योजना समभाग आणि समभागांशी संबंधित साधनांमध्ये (६५ ते १०० टक्के ), डेट आणि चलन बाजार रोख्यांमध्ये (० ते ३५ टक्के), रिटस् आणि इनव्हीट्स व्दारे जारी केलेल्या युनिट्समध्ये (० ते १० टक्के) आणि म्युच्युअल फंड योजनांच्या युनिट्समध्ये (० ते १० टक्के) गुंतवणूक करेल.

“बडोदा बीएनपी परिबा एएमसीमध्ये, सक्षम अशी गुंतवणूक संस्कृती आहे आणि तिला शिस्तबद्ध कार्यपध्दती, अनुभवी तज्ज्ञांचा चमू आणि भक्कम कार्यप्रणालीची जोड लाभलेली आहे. अंतर्गत मूल्यपातळीवर सवलतीत उपलब्ध असलेले समभाग गुंतवणूकीच्या संधीसाठी हुडकून काढणे, हे बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू या नवीन फंडासाठी आमचे उद्दिष्ट आहे. या संधी समभाग, क्षेत्र आणि बाजार मूल्य यामध्ये असू शकतात. जोखीमचे उत्तमप्रकारे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी आमच्याकडे सक्षम अशी सुरक्षेची चौकट आहे :- ताळेबंद, कमाई आणि मूल्यांकनामध्ये सुरक्षिततेची किनार आमच्या ‘थ्री एस चौकटीचे प्रतिनिधित्व करते,” अशी टिप्पणी बडोदा बीएनपी परिबा म्युच्यूअल फंडाचे सीईओ सुरेश सोनी यांनी या नव्या फंडाच्या शुभारंभप्रसंगी केले.

सुरक्षिततेच्या पुरेशा उपायांसह मूल्य समभागांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्या आणि वाढ-उन्मुख पोर्टफोलिओमधून विविधता हवी असणाऱ्या दीर्घकालीन संयमी गुंतवणूकदारांसाठी ही नवीन योजना अतिशय समर्पक आहे. कमाईत संभाव्य वाढ तसेच फेरमूल्यांकनाचा लाभ मिळवणे हा या फंडाचा उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading