fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी 20 परिषदेसाठी सचिवालय कार्यालयाची स्थापना

पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जून महिन्यात जी 20 ची शैक्षणिक विषयावर परिषद होणार आहे. या परिषदेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी व यासंदर्भात विविध बैठकांचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठात सचिवालय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते आज दि १७ मे २०२३ रोजी दु.३.०० वाजता करण्यात आले.

यावेळी प्र- कुलगुरु डॉ संजीव सोनवणे,विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे,कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार,वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर,अधिसभा सदस्य राहूल पाखरे, आयक्यूसीचे संचालक डॉ.संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाने जी 20 परिषदेच्या अनुषंगाने श्री रवींद्र शिंगणापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे इतरही सभासद असून त्यांना या सचिवालय कार्यालयातून विविध बैठकां व जी 20 परिषदेच्या नियोजनाचे काम करता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading