जगातील सर्वात मोठ्या मूल्यशिक्षण प्रतियोगीतेचे ‘इस्कॉन’ तर्फे आयोजन
पुणे : इस्कॉनतर्फे गीताजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या मूल्यशिक्षण प्रतियोगीतेचा भव्य बक्षिस वितरण समारंभ कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मध्ये कमलनयन बजाज अतिथी भवनात साजरा झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून पुणे जिल्हा सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, व्हिआयटी काॅलेजचे संचालक राजेश जालनेकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.
इस्कॉन ही एक जगप्रसिद्ध संस्था आहे. जी समाजात आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जिवनात गीतेवर आधारीत मूल्य शिक्षण प्रतियोगीता इस्कॉन दरवर्षी आयोजित करत असते.
नारायण शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त करीत “मूल्यशिक्षण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि याशिवाय समाजात सुख शांती समाधान अनुभवास येणार नाही. शालेय जीवनातच यांचे शिक्षण मिळाले पाहीजे” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
भारतभरात २५ जिल्ह्यात ७ मल्टीनॅशनल कंपनींनी यात पुरस्कार प्रायोजीत केले आहेत. मोटो व्हॉल्ट तर्फे प्रत्येक जिल्ह्यात १ इलेक्ट्रिक सायकल, हरक्युलीस बिसए तर्फे प्रत्येक जिल्ह्यात ४ सायकल, पोट्रोनिक्सतर्फे स्मार्ट वॉच, सँडीस्क तर्फे पेनड्राईव, क्विक हिल तर्फे बॅग, अनफोल्डयू तर्फे एक वर्षाचा फ्री शालेय अभ्यासक्रम, फिनोलिक्स पाईप्स तर्फे विद्यार्थ्याना कॅलेंडर देऊन अभिनंदन करण्यात आले. वरद राजदास यांनी आभार प्रदर्शन केले.
