Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ७७६ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. डोळे तपासणी, रक्त तपासणी पासून ते लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया, अस्थिरोग तपासणी देखील विनामूल्य स्वरुपात शिबीरात करण्यात आली. जय गणेश प्रांगण, काका हलवाईसमोर बुधवार पेठ येथे झालेल्या शिबारीत ७७६ जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

शिबीर उद््घाटनप्रसंगी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, पराग बंगाळे आणि सहका-यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात शिबीर हा एक भाग आहे. या आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, चष्मेवाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्ताच्या विविध तपासण्या, कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीएशन, लहान मुलांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रिया, डायलिसिस सुविधा, लहान मुलांच्या व्रणाच्या शस्त्रक्रिया, दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबीराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना माफक दरामध्ये एमआयआय, सीटी स्कॅन, एक्स-रे सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली.

आदित्य बिर्ला मेमेरियल हॉस्पिटल, लायन्स क्लब व ससून रुग्णालय नेत्र विभाग, रॉयल मुधोळ हॉस्पिटल शंकरशेठ रस्ता, डायग्नोपेन डायग्नोस्टिकसेंटर, सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, एकॉर्ड हॉस्पिटल मोशी, क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांनी शिबीरात सहभाग घेत सेवा दिली. दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading