Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला 

मुंबई : देशाला, पक्षाला, राज्याला शरद पवार यांची गरज आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत राष्ट्रवादी पक्षाच्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला आहे, अशी माहिती खासदार व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

पटेल म्हणाले, शरद पवार यांनी  राजीनामा जाहीर करताना आम्हा कोणालाही विश्वासात घेतलं नाही. त्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही सर्व आवाक झालो. शरद पवार हे देशातले मोठे नेते आहेत. त्यांची देशाला, पक्षाला, राज्याला गरज आहे. त्यामुळे आज झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला. आज झालेल्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा एकमताने नामंजूर केला असून. त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावे. शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भावनेचा विचार करून  राजीनामा त्यांनी मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, या ठरावासह राष्ट्रवादीची समिती शरद पवार यांना भेटणार असून त्यानंतर पवार आपला निर्णय जाहीर करतील.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading