Friday, May 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री सान्या मल्होत्राने गुडगावमध्ये घेतलं स्वतःच ” ड्रीम होम “

सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे कारण ती तिच्या आगामी ” कठल ” चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत असून ती पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, अभिनेत्रीने स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी गुडगाव, दिल्ली येथे चार BHK आणले जेथे तिला तिच्या बीजी शेड्यूल मधून वेळ मिळेल तेव्हा वेळ घालवण्याची संधी मिळाली की तिकडे ती वेळ घालवणार आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून तिच्या नव्या घराची एक झलक दाखवत हा बेस्ट क्षण शेयर केला. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव केला असून तिची स्वप्न पूर्ण केल्या बद्दल तिचं कौतुक केलं.

अशोक मिश्रा यांनी लिहिलेले आणि यशोवर्धन मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेला कठल 19 मे 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि सिख्या एंटरटेनमेंट या बॅनरखाली शोभा कपूर, एकता कपूर, गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या अभिनेत्रीमध्ये सॅम बहादूर आणि सौ. पग्लाईटनंतर, कठल सान्याचे गुनीत मोंगासोबत दुसरे सोबत काम असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading