चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी ‘या’ दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास
मुंबई : स्वतः स्वतंत्र लेखन, दिग्दर्शन केलेला चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं हे प्रत्येक दिग्दर्शकाच स्वप्न असतं मात्र हे स्वप्न सत्यात येण्याच्या काही तास आधीच लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचा पहिला लेखन, दिग्दर्शन केलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ (Marathi Paul Padate Pudhe) हा चित्रपट उद्या (5 मे) प्रदर्शित होणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधीच मायेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 46 वर्षांचे होते. यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
गेले काही महिन्यांपासून ते आजारी होते. स्वप्नील मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तर त्यांचा पहिला लेखन, दिग्दर्शन केलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट 5 मे रोजी म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. मात्र या घटनेमुळे मराठी चित्रपट सृष्टीसह या चित्रपटाच्या टीमवरदु:खाचा डोंगर कोसळला आहे.
