बैठकीबाबत सांगण्याची आवश्यकता वाटली नसावी – जयंत पाटील
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनानंतर आता पक्षातील अंतर्गत कलह समोर येऊ लागला आहे. कारण आज राष्ट्रवादी पक्षाच्या सुरू असलेल्या बैठकीबाबत काहीही माहिती नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. जयंत पाटील यांनी पुण्यात माध्यमानशी संवाद साधतांना आजची बैठक ही राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. पण कदाचित त्यांना या बैठकीबाबत मला सांगण्याची आवश्यकता वाटवी नसावी, सगळीकडे आपण असावचं असा आग्रह आपण पण करू नये, असे सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, “मी राष्ट्रीय नेता नाहीये, त्यामुळे अशा बैठकांबाबत काही माहिती नव्हते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मी साखर कारखान्याच्या बैठकीला आलो. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा जाईल, पण शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा,” अशी माहिती जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. परंतु ही माहिती देत असताना जयंत पाटील यांच्यावर चेहऱ्यावर यावेळी नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर जयंत पाटील हे नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.
शरद पवार यांच्या निर्णयानंतर पक्षाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, बऱ्याच जिल्हाध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअपला राजीनामे पाठवले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा पाहिलेला नाही. तर ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा राजीनामा आलेला आहे. त्यामुळे पक्षातील सर्व वरिष्ठ बसून लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान, पक्षात सुरू असलेल्या बैठका.. या बैठकांना जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांना माहित नसणे. तसेच पक्षाकडून जाणूनबुजून बैठकीसाठी आमंत्रण न देणे, यामुळे जयंत पाटील यांची नाराजी पूर्णतः दिसून येत आहे. पण तरी देखील पक्ष माझ्यावर आणि मी पक्षावर नाराज नाही, असे हसत सांगणे यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे.
