Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

अवयवदान चळवळीला बळकटी मिळण्यासाठी जनजागृती आवश्यक – चंद्रकांत पाटील

पुणे : रक्तदानाप्रमाणे अवयवदान चळवळीला बळकटी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात संवाद कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे औचित्य साधून अवयवदान चळवळीत मोलाचे योगदान देणार्‍या २१ घटकांचा देवदूत पुरस्कार देऊन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मॉडर्न विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संयोजक डॉ. संदीप बुटाला, मनिषा बुटाला, भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस (कार्यालय) रवी अनासपुरे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, मन की बातच्या गेल्या भागात मोदींनी अवयवदान चळवळीवर भाष्य केले होते. त्यामुळे या विषयाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून नियोजनबद्ध योजना आखून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महापालिका स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सुचना करण्यात येतील.
देवदूत पुरस्काराने सन्मानित
अवयव दाते – स्वराली गुजर, स्वप्निल केदारी, सौ. टोकेकर
अवयव प्रत्यारोपण सर्जन व अतिदक्षता विभाग – डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. रविंद्र कोलते, डॉ. वृषाली पाटील
समन्वयक – आरती गोखले, वृंदा पुसाळकर, मयुरी बर्गे, शर्मिला पाध्ये
ग्रीन कॉरिडोअर – पीएसआय इनामदार, प्रकाश मोहिते, बाबाजी आहेर, जिवाजी पोटे, सत्यवान साबळे
स्वयंसेवी संस्था – वंचित विकास व शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट, रिबर्थ ङ्गाउंडेशन, रोटरी इंटरनॅशनल क्लब, जनकल्याण समिती, लायन्स इंटरनॅशनल क्लब
रुग्णवाहिका – शंकर नेटके, अविनाश शिंदे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading