भूमी पेडणेकर तिच्या आगामी चित्रपट अफवाह मध्ये अफवा पसरवण्याचा विरोधात का आहे?
सुधीर मिश्राचा “अफवाह” हा वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे कारण त्यांची मनोरंजक कथा आणि अनेक प्रतिभावंत कलाकारांच्या सोबतीने हा चित्रपट घडणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट धोकादायक अफवांच्या विरोधात भाष्य करतो अफवाचा लोकांच्या जीवना वर कसा परिणाम होतो यावर हा चित्रपट बोलतोय.
भूमी पेडणेकरसाठी “अफवाह” चा भाग असणे हा एक प्रेरणादायी अनुभव आहे. अभिनेत्री म्हणते, “अफवाह ही एक कथा आहे जी काळाची गरज आहे. अफवांमध्ये खूप शक्ती असते आणि आपण त्यांच्या विरोधात उभे राहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा ही कथा मला सांगितली गेली, तेव्हा मी कथे सोबत कनेक्ट झाली.
विचार करायला लावणारा संदेश आणि प्रतिभावान कलाकारांसह, “अफवाह” प्रेक्षकां च्या मनावर कायमचा प्रभाव टाकेल याची खात्री आहे.
अफवाहची कथा एका चुकीच्या अफवेने तीन जीवनात गोंधळ आणि कहर कसा घडवून आणला आहे याभोवती फिरते. चित्रपटात एका खोट्या अफवेच्या नंतरचे परिणाम देखील चित्रित केले आहेत आणि तो एक राक्षस आहे जो तुमचा पाठलाग करणे थांबवत नाही. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनीही या चित्रपटाची वाट बघत आहेत.
अफवाहचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणेकर, शारीब हाश्मी, सुमित कौल, सुमीत व्यास, रॉकी रैना आणि टीजे भानू यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या बनारस मीडिया वर्क्स या बॅनरखाली तयार केला आहे आणि 5 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.
