Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुदानमध्ये अडकलेल्या शंभर सांगलीकरांसाठी जयंत पाटील सरसावले

मुंबई  : सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले असून या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.

सुदानमध्ये सुरु असलेल्या देशातंर्गत यादवी युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे १२०० किलोमीटरवर हे नागरीक आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading