Sunday, June 21, 2026
Latest NewsSports

Rollball World Cup : भारत, पोलंड, श्रीलंका संघांची आगेकूच कायम

सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा : फ्रांस, युगांडा, इजिप्त पराभूत

पुणे : भारत, पोलंड, श्रीलंका, केनिया संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना वरिष्ठ गटाच्या सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत महिला गटातून श्रीलंका संघाने फ्रांस संघाला  २-१ असे पराभूत केले. मध्यंतराला दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती. श्रीलंका संघाकडून एम. डी. दिदुलानी व एन विनुशा यांनी प्रत्येकी एक गोल केला. फ्रांस संघाकडून जेसिका बिलार्डने एक गोल केला.

पुरुष गटात पोलंड संघाने युगांडा संघाला ७-२ असे पराभूत केले. मध्यंतराला पोलंड संघाने ४-१ अशी आघाडी घेतली होती. पोलंड संघाच्या सत्यम राडडीयाने तब्बल ६ (०.२२, १०.४४, १६.५१, १८.२५, २१.०० व २५.४० मिनिटे) गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. झेत्कोवास्की एम.ने एक गोल केला. युगांडा संघाकडून केवेस्या आली व क्याडा सिमोन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष गटाच्या पुरुष विभागात भारताने इजिप्त संघाला ६-४ असे पराभूत केले. मध्यंतराला इजिप्त संघाने २-१ अशी आघाडी घेतली होती. भारताकडून मिहीर साने (२९.१० व ३२.५०) व विकी सैनीने (२२.०३ व ३९.३०) प्रत्येकी २ गोल केले. आकाश गणेशवाडे (९.३०) व सचिन सैनी (३४.३०) यांनी प्रत्येकी एक गोल केला. इजिप्त संघाकडून हसन अहमदने २ (७.१५ व ३७.१०) तर, डेसौकी कासेब (१३.५५) व अब्दुल फतेहने (२८.१२) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पुरुष गटाच्या अन्य लढतींमध्ये नेपाळ संघाने ब्राझीलला २-० असे पराभूत केले. नेपाळने मध्यंतराला १ -० अशी बरोबरी साधली. नेपाळ संघाकडून श्रेष्ठराज यांने २ गोल करताना संघाला विजयी केले. याच गटातील अन्य लढतीमध्ये लॅटव्हिया संघाने येमेन संघाला ३-१ असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. लॅटव्हिया संघाने मध्यंतराला ३-१ अशी आघाडी घेतली होती. एल्व्हिस बारकौस्कीसने २ तर सीमारमेनीस व्हायट्युरस १ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. याच गटातील अन्य लढतील आयव्हरी कोस्ट संघाने सिरीया लिओन संघाला ५-१ असे पराभूत करताना विजय साकारला. आयव्हरी कोस्ट संघाने मध्यंतराला ४-० अशी आघाडी घेतली होती. लथ तिमुरीने २, क्लाउडीयो सिलीर, नांदो कोफी व काफान्डो गिल्बर्ट यांनी प्रत्येकी १ गोल केला.

महिला विभागातून सिरीया लीवोन संघाला पोलंड संघाने ७-१ असे पराभूत केले. पोलंड संघाने मध्यंतराला ५-१ अशी आघाडी घेतली होती. पोलंडच्या निचेविज माल्स्काने ३, सेनोविक मारियाने २ तर स्ट्रोलार्ज बार्बराने २ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. सिरीया लीवोन संघाकडून कामरा हस्सुनातूने एक गोल केला.

पुरुष गटात केनिया ने इराण संघाला ८-२  असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. मध्यंतराला केनिया संघाने ७-१ अशी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून बोनिफेस नडूराने ३, ग्रीफेन्स एलेग्वा व ब्रेन मेटीकोने प्रत्येकी २ गोल केले. जोसेफ अवख्वलाने १ गोल केला. इराण संघाकडून मजीद हमीदपन्नाह व नाविद लकने प्रत्येकी १ गोल केला.

पुरुष गटात आयव्हरी कोस्ट संघाने फ्रांस संघाला ७-२ असे पराभूत केले. मध्यंतराला आयव्हरी कोस्ट संघाने ५-१ अशी आघाडी घेतली होती. आयव्हरी कोस्ट संघाकडून लथ तिमोथी व नान्डो कोफी यांनी प्रत्येकी ३ तर काफान्डो गील्बर्दने १ गोल केला. फ्रांस संघाकडून फील एटोनीने २ गोल केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading