Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सुरक्षित मातृत्वाविषयी जनजागृती अभियानाचे आयोजन

पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवीच्या इंदिरा गांधी प्रस्तुती रुग्णालय ,इंडियन मेडिकल असोसिएशन व पिंपरी चिंचवड भोसरी ब्रँच वुमेन्स डॉक्टर्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित मातृत्वाविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सांगवीतील इंदिरा गांधी प्रस्तुती रुग्णालयात करण्यात आले.
यामध्ये गर्भवती माता ,आशा वर्कर आणि इंदिरा गांधी प्रस्तुती रुग्णालयातील इतर कर्मचारी सहभागी झाले .
यावेळी शंभर लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे होते
डॉ. पवन साळवे,डॉ. वर्षा गवई ,डॉ .तृप्ती सागळे,डॉ. सुप्रिया बिरादार यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले
इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड -भोसरी मेडिकल ब्रँच वुमेन्स डॉक्टर्स विंग अध्यक्षा व नवी सांगवीतील प्रसिध्द मॅट्रिक्स इमेजिंग सेंटरच्या डॉ. रितू लोखंडे यांनी सुरक्षित मातृत्वाविषयी सोनोग्राफी कोणत्या महिन्यात करावी व सोनोग्राफीचे महत्त्व सांगितले
नवी सांगवीतील मॅट्रिक्स इमेजिंग सेंटर मध्ये अल्पदरात सोनोग्राफी करून देण्याचे आश्वासन दिले
सदर कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे ,ज्येष्ठ प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड-भोसरी ब्रँच वुमेन्स डॉक्टर्स विंग अध्यक्षा डॉ.रितू लोखंडे ,सहअध्यक्षा डॉ.ज्योती डेकाटे ,प्रेसिडेंट डॉ.सुशिल मुथीयान ,सचिव डॉ. अनिरुद्ध टोणगावकर या टीमने कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासंबंधी संधी दिल्याबद्दल मनपा आरोग्य विभाग व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मनपा आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी प्रस्तुती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती सागळे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
डॉ .ज्योती डेकाटे यांनी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading