Tuesday, September 1, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. संरक्षणमंत्र्यांना सध्या सौम्य लक्षण असून त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार, राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये झालेल्या कमांडर कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. तर आज राजनाथ सिंह नवी दिल्लीत भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते आज या परिषदेत उपास्थित राहू शकले नाही.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading