Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Corona Updates : महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती बिघडली; कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्यावर   

मुंबई : उन्हाचा कहर जसा वाढत चालला आहे तशी कोरोनाची रुग्ण संख्या देखील झपाट्याने वाढायला लागली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात तब्बल ११०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यासारकारची चिंत्ता वाढली असून आता नागरिकांनी अधिक सजक व जागृत राहण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार, गेल्या २४ तासात महाराष्ट्रात तब्बल ११०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आज दिवसभरात नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांचा धरून आता महाराष्ट्रात ८१ लाख ५८ हजार ३९३ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर मृत रुग्णांचा आकडा वाढून तो १ लाख ४८ हजार ४८९ इतका झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार १०२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गेल्या २४ तासात २३४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading