Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे सरकारचा मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याच्या कामात घोटाळा आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिंदे सरकारला मुंबईतील रस्ते आणि विकास कामावरून घेतलय. मातोश्रीवर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामात मुख्यमंत्री सरकार जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाालिकेच्या रस्ते कामासाठी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर 50 टक्क्यांहून जास्त वाढले असून त्याचा परिणाम कामावर आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची असल्याचं प्रश्न ही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय..

मुंबईमध्ये 400 किमीचे रस्ते क्रॉंकेटचे काम सुरू केल्याचे केवळ सांगितलं जात आहे. पण रस्त्याची आणि फुलांची काम ठप्प आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याजवळच्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर चा फायदा करून देण्यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत का? असा सवाल विचारण्यात आला आहे. मुंबई मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या क्रॉंकेटीकरणावरून आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करताना काही प्रश्न उपस्थित केलेत

मुंबईतील कॉंक्रीट रस्त्याचे कंत्राटं काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेलं नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. घोषणा करताना सीसीटीव्ही लावले जातील. काम कुठं पर्यंत पोहचलं त्याची माहिती लोकांना कळवली जाईल पण त्याचा देखील पत्ता नसल्याचं ते म्हणाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading