fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

ग्लेनमार्कचा भारताच्या श्वसनसंबंधित औषध बाजारात विस्तार

पुणे  : नाविन्यतेवर आधारित जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) श्वसनसंबंधित औषध बाजारात आपली स्थिती आणखी भक्कम केली असून भारतीय औषध बाजारात तिला दुसरे स्थान मिळाले आहे.* श्वसनसंबंधित औषधांसाठी ग्लेनमार्क हा विश्वासार्ह ब्रँड असून अॅस्कोरील, अॅस्कोरील एलएस, अॅस्कोरील डी आणि अॅलेक्स असे तिचे ब्रँड आहेत. बिलाझॅप एम आणि ऱ्यालट्रिस एझेड/मोनो असे कंपनीचे आधुनिक आणि नाविन्यपूर्ण उत्पादन हेही रुग्ण आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय आहेत. गेल्या एक वर्षात १ लाख वैद्यकीय व्यावसायिकांनी तिच्या श्वसनसंबंधित औषधे प्रिस्क्राईब केली असून देशभरातील सर्व वयोगटातील ४ कोटींपेक्षा जास्त रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे.
ग्लेनमार्क ही ओएडीच्या (ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज) आधुनिक उपचारांची भारतातील अग्रणी असून अस्थमा (दमा) आणि सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) या आजाराच्या रुग्णांच्या गरजांवर लक्ष देणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे. डिजिटल डोज इन्हेलर्स, अल्ट्रा एलएबीए+आयसीएस, सिंगल इन्हेलर थेरपी आणि नेब्यूलाईज्ड एलएएमए असे दीर्घकालीन श्वसनसंबंधित आजाराच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उत्पादन सादर करणारी ग्लेनमार्क ही पहिली कंपनी आहे. या उत्पादनांनी दीर्घकालीन श्वसनसंबंधित आजार असलेल्या रुग्णांना अधिक उत्तम श्वास घेणे आणि आपल्या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यास मदत झाली आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि इंडिया बिझिनेस हेड श्री. आलोक मलिक म्हणाले, श्वसनसंबंधित क्षेत्रात अग्रणी कंपन्यांपैकी एक म्हणून भारतीय औषध उद्योगात आमची स्थिती भक्कम करण्यामध्ये आमची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि रुग्ण-केंद्रीत दृष्टिकोन यांचा मोठा वाटा आहे. आपल्या रुग्णांसाठी बाजारपेठेतील पहिली औषधे उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने आम्ही प्रेरित आहोत आणि आम्ही सुरक्षित व कार्यक्षम नवीन औषधे सादर करत राहू.

गेल्या काही वर्षांत कंपनीचा अॅस्कोरील ब्रँड अनेक पटींनी वाढला असून त्याच्या जनजागृती मोहिमांमुळे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. श्वसनसंबंधित क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून ग्लेनमार्कच्या स्थितीतून श्वसनसंबंधित आजारांसाठी नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपाय पुरविण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब पडलेले आहे.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज डेटा १ च्या विश्लेषणानुसार, श्‍वसनाशी संबंधित आजारांमध्ये भारताचा वाटा ३२ टक्के आहे आणि यासाठी प्रदूषण हे सर्वात मोठे कारण आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading