Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिका बीआरटी मार्ग हटवणार

पुणे : शहरातील बीआरटी मार्ग नावालाच उरला आहे. यामध्ये नगररस्त्यावरील बीआरटी केवळ सांगाडा गेल्या अनेक वर्षापासून उभा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता नगर रस्त्यावरील बीआरटी प्रकल्प सुरु ठेवायचा की नाही याबाबत अभ्यास करणार आहे. प्रकल्प व्यवहार्य नसल्यास बीआरटी काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नगररस्त्यावरील बीआरटी संदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बीआरटी मार्ग काढण्यापुर्वी याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. बीआरटी यारस्त्यावरुन चालवणे शक्य आहे का? बीआरटीचा प्रवाश्यांना किती प्रमाणात उपयोग होत आहे. वाहतूकीच्या दृष्टीने बीआरटी सोयीची आहे का? त्याचबरोबर सर्व वाहनांसाठी हा मार्ग खुला केल्यास त्याचे काय परिणाम होतील याविषयी अभ्यास करण्यात येत आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

विधीमंडळामध्ये नगररस्त्यावरील बीआरटी प्रकल्प काढण्याबाबात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. यानंतर याबाबातचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी याबाबत अधिवेशनामध्ये प्रश्‍न उपस्थित केला होता. बीआरटीमुळे नगररस्त्यावर सतत वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाणी साचत असल्याचे टिंगरे यांचे म्हणणे होते. मंत्री उदय सामंत यांनी नगर रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून काम पुर्ण झाल्यानंतर यामधून दिलासा मिळणार असल्याची माहिती दिली होती. बीआरटी प्रकल्प काढणे हा उपाय नाही. बीआरटी प्रकल्प हवा की नको याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. येत्या महिन्याभरामध्ये याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. सुमारे 1 हजार कोटींपेक्षा जास्त निधी बीआरटी प्रकल्पासाठी खर्च करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading