WH-1000XM5 हेडफोनच्या सर्व उत्कृष्ट वैशिष्ठ्यांचा आनंद आता स्टायलिश निळ्या रंगामध्ये घ्या
२०२२ मध्ये WH-1000XM5 वायरलेस हेडफोन बाजारात आल्यापासून त्याच्या उत्कृष्ट ध्वनीची गुणवत्ता आणि पार्श्वभूमीतील आवाज काढून टाकणाऱ्या वैशिष्ठ्यांसाठी त्यास असंख्य पुरस्कार आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. सोनी आता सुप्रसिद्ध WH-1000XM5 वायरलेस हेडफोनच्या या सर्व लोकप्रिय तंत्रज्ञानाला नवीन स्टायलिश मिडनाइट ब्ल्यू रंगात आणत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचा ऐकण्याचा अनुभव अजून जास्त वैयक्तिकृत करता येईल. सोनीने WH-1000XM5 वायरलेस हेडफोन मिडनाइट ब्ल्यू हे केवळ स्टाइलच नाही तर शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून ही डिझाईन केले आहे. दोन्ही मॉडेल्सच्या पॅकेजिंगच्या मालामध्ये शून्य प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे, जे सोनीची त्यांच्या उत्पादन आणि उत्पादन पद्धतींमध्ये पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याची वचनबद्धता दर्शवते.
किंमत आणि उपलब्धता:
मिडनाइट ब्ल्यू रंगातील WH-1000XM5 ग्राहकांसाठी १४ एप्रिल २०२३ पासून Amazon.in या ई-कॉमर्स संकेतस्थळावर उपलब्ध होईल
