Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

भाजप कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

पुणे  ; कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर टीका करून अपमान केला आहे हे भारतातील कुठलाच सावरकर प्रेमी सहन करणार नाही राहुल गांधी यांनी टीका करून आपल्या बुद्धीची पात्रता दाखवून दिली आहे असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले
भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रे दरम्यान रासने बोलत होते पुढे बोलताना सावरकर यांचे देशप्रेम वादातीत आहे जे कष्ट हाल स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगले ५०वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ज्या सावरकरांनी भोगले त्याची आपण कल्पना ही करू शकत नाही सावरकर हे नाव नाही तर तो एक विचार आहे आणि हा विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजला आहे
या वेळी बोलताना माजी महापौर व प्रदेश भा ज पा चे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी सावरकर देशाचे आदर्श आहेत त्यामुळे हा त्यांच्या वरील टीका आम्ही कदापि सहन करणार नाही जे राहुल गांधी सावरकर यांच्या वर टीका करतात त्यांनी आपली पात्रता ओळखून प्रतिक्रिया द्यावी नाहीतर ह्याचे जशास तसे उत्तर देता येईल असा इशारा दिला
या यात्रेला पुणे शहराचे प्रभारी माजी सभागृह नेते धीरज घाटे ,सावरकर यांचे पणतू सत्यकी सावरकर, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे आर पी आय चे मंदार जोशी पतित पावन चे स्वप्नील नाईक यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading