Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

आदिवासी आणि गोंड चित्रकला प्रदर्शन 13 एप्रिल पासून

पुणे : इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्यातर्फे १३ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान ‘कला स्पंदन’ या कला महोत्सवाचे आयोजन सिद्धी बँक्वेट हॉल, वकील नगर, पुणे येथे करण्यात आले आहे. या कला महोत्सवात देशभरातून विविध राज्यांचे कलाकार आणि आर्ट गॅलरी सहभागी होणार आहेत. दिल्लीच्या ओपीएस आर्ट गॅलरीने या महोत्सवात आदिवासी आणि गोंड कलेवर आधारीत चित्र सादरीकरण केले आहे.

ओपीएस गॅलरीचे संचालक ऋषी शर्मा यांनी सांगितले की, देशातील विविध भागातील आदिवासी आणि गोंड कला प्रदर्शित करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ओपीएस गॅलरी करत आहे. या कला महोत्सवात गॅलरीच्या ४० चित्र कलाकृती ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये नवोदित चित्रकारांच्या कलाकृतींचाही समावेश आहे. हा कला महोत्सव सकाळी ११ ते संध्याळाकी ८ वा. पर्यंत रसिकांसाठी खुला असेल. कला रसिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन ओपीएस आर्ट गॅलरी तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading