Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ

मुंबई : राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षा पासून आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार आज अकोला येथून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा वाटपास सुरूवात करण्यात आली.   

आज आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, पुरवठा अधिकारी प्रतिक्षा देवणकर, विजय अग्रवाल, विठ्ठल सरप व लाभार्थी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.  

शिधा वितरण प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकऱ्यांना सण उत्सव साजरे करता यावे याकरीता आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयामुळे  गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचा आनंद व्दिगुणीत झाला असून निश्चितच त्यांना लाभ होणार आहे.आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी, अशी सूचना आ. सावरकर यांनी केली.

असा असेल आनंदाचा शिधा

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे रवा, चणाडाळ, साखर व पामतेल हा शिधा देण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने 100 रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरीत होणार आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading