साताऱ्यात मास्कसक्ती; राज्यात पुन्हा एकदा निर्बंधांचे सावट
सातारा : ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट XBB.1.16 मुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची (Corona) लाट उसळली आहे. सातारा, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पसरतोय. साताऱ्यात नव्या विषाणूनं (New Variant) दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून साताऱ्यात (Satara) पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंती यांनी परित्रक काढून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्यात वाढत असलेल्या इन्फ्लुएन्झा आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी आणि उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे आदेश दिले.
दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात देखील मास्क सक्तीसह इतर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
