fbpx

एमईएस क्रिकेट क्लब हेज् अँड सॅचज् संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब आणि हेज् अँड सॅचज् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अदवय सिधये याच्या तडाखेबाज शतकी खेळीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लब संघाने किंग्ज् स्पोर्ट्स क्लबचा ७१ धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. डावखुरा फालंदाज अदवय सिधये याच्या १०८ धावा आणि कर्णधार जय पांडे याच्या ५९ धावांच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने १८ षटकात २१९ धावांचा डोंगर रचला. जय आणि अदवय यांनी दुसर्‍या ७० चेंडूत १२२ धावांची भागिदारी केली. तिसर्‍या गड्यासाठी अदवय आणि वरूण यांनी ३३ चेंडूत ९१ धावांची भागिदारी करून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज् स्पोर्ट्स क्लबचा डाव १४८ धावांवर मर्यादित राहीला.

आदित्य रावत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर हेज् अँड सॅचज् संघाने ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा ५६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेज् अँड सॅचज् संघाने १८५ धावांचे आव्हान उभे केले. आदित्य रावत (४७ धावा), निलेश ढगे (४४ धावा), मुस्ताक शेख (३५ धावा) आणि चैतन्य पाटील (३३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा डाव १२९ धावाच करू शकला. प्रसन्न वर्तक (३-१९) आणि आदित्य रावत (२-११) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एमईएस क्रिकेट क्लबः १८ षटकात ४ गडी बाद २१९ धावा (अदवय सिधये १०८ (५९, ४ चौकार, ११ षटकार), जय पांडे ५९ (३४, ५ चौकार, ३ षटकार), वरूण गुजर ३५, निखील बाबू २-३८); (भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी जय आणि अदवय यांच्यात १२२ (७०); तिसर्‍या गड्यासाठी अदवय आणि वरूण यांच्या ९१ (३३) वि.वि. किंग्ज् स्पोर्ट्स क्लबः १८ षटकात ८ गडी बाद १४८ धावा (शुभम पाटील ४६, धीरज गव्हाणे २२, जय पांडे ४-२१); सामनावीरः अदवय सिधये;

हेज् अँड सॅचज्ः २० षटकात ६ गडी बाद १८५ धावा (आदित्य रावत ४७, निलेश ढगे ४४, मुस्ताक शेख ३५, चैतन्य पाटील ३३, अजय पाटील २-४२) वि.वि. ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटाकात १० गडी बाद १२९ धावा (क्षितीज कबीर १५, उत्कर्ष चौधरी १५, प्रसन्न वर्तक ३-१९, आदित्य रावत २-११); सामनावीरः आदित्य रावत;

Leave a Reply

%d bloggers like this: