राष्ट्रीय संरक्षण अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक – मंत्री अतुल सावे
मुंबई : नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अकादमीबाबत पर्यटन विभागासोबत लवकरच बैठक घेणार आहे, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सावे म्हणाले की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील मौजे नायगाव येथे महाज्योती संस्थेमार्फत मुलीकरिता निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास 24 कोटी रुपयांचा निधी महाज्योती संस्थेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात असून जागा हस्तांतरणाची कार्यवाही चालू आहे.