fbpx

इंडियन ऑईलचे अध्‍यक्ष एस एम वैद्य सीईओवर्ल्‍ड मॅगझीन रँकिंग फॉर २०२३ मध्‍ये ठरले टॉप इंडियन सीईओ

पुणे: इंडियनऑईलचे अध्‍यक्ष एस. एम. वैद्य यांना सीईओवर्ल्‍ड मॅगेझीनने त्‍यांच्‍या वर्ष २०२३ साठी वर्ल्‍ड्स मोस्‍ट इन्‍फ्लूएन्शियल सीईओंच्‍या वार्षिक यादीमध्‍ये टॉप इंडियन सीईओ म्‍हणून स्‍थान दिले आहे.  वैद्य भारतीय सीईओंमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहेततर ९६ देशांमधील १,२०० हून अधिक सीईओंच्‍या यादीमध्‍ये जागतिक स्‍तरावर ८१व्‍या स्‍थानावर आहेत.

आपले विचार व्‍यक्‍त करत एस. एम. वैद्य म्‍हणाले, ‘‘मी या सन्‍मानासाठी आभार व्‍यक्‍त करतो. ही फक्‍त वैयक्तिक उपलब्‍धी नसून यामधून इंडियन ऑईल टीमचे ऊर्जा-सुरक्षित हरित भविष्‍याकडे वाटचाल करण्‍याप्रती एकत्रित प्रयत्‍न दिसून येतात. इंडियन ऑईल उल्‍लेखनीय प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे आणि हा सन्‍मान नव्‍या उंचीवर पोहोचण्‍याचा आमचा संकल्‍प अधिक दृढ करतो.’’

डाउनस्ट्रीम पेट्रोलियम उद्योग व रिफायनरी-पेट्रोकेमिकल एकात्मतेचा ३६ वर्षांहून अधिक अनुभव असलेले आघाडीचे ऊर्जा तंत्रज्ञ म्हणून वैद्य यांनी जागतिक ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता संवादांमध्ये सक्रियपणे योगदान दिले आहे. इंडियन ऑईलच्‍या मुख्य इंधन व्यवसायाला दिशा दाखवण्‍यासोबत त्यांनीइंडियन ऑईलला ग्रीन अजेंडाद्वारे पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या एका नवीन युगात नेलेज्याला २०४६ पर्यंत नेट शून्य ऑपरेशनल उत्सर्जन साध्य करण्याचे इंडियन ऑईलचे उद्दिष्ट घोषित केल्यावर नवीन गती मिळाली. इंडियन ऑईलचेध्येय हरित सहयोगमहत्त्वपूर्ण आरअॅण्‍डडी व नाविन्यपूर्ण शाश्वत पद्धतींद्वारे गेम-चेंजर म्हणून उदयास येत आहे.

वैद्य यांनी भारतातील चीता पुनरुत्पादन प्रोग्रामला पाठिंबा देणे आणि भारतीय एकशिंगी गेंड्यांचे संरक्षण करणे यांसारख्या उपक्रमांद्वारे कॉर्पोरेट भारताच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये इंडियन ऑईलला ठामपणे आघाडीवर ठेवले आहे. लोक-केंद्रित दृष्टिकोनातून प्रेरितइंडियन ऑईल आरोग्यसेवाशिक्षणमहिला सक्षमीकरण आणि वारसा संवर्धन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सामाजिक प्रसारासह भारतातील सर्वात मौल्यवान सामाजिक उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आले आहे.

सीईओवर्ल्डच्‍या रँकिंगने वैद्य यांचे विचारशील नेतृत्वजागतिक प्रभाव आणि जगभरातील ऊर्जा संवर्धनाप्रती त्‍यांच्‍या योगदानाला सन्‍मानित केलेमूल्यांकन मापदंडांमध्ये कंपनीचे आर्थिक उत्पन्नपर्यावरणीय ट्रॅक रेकॉर्डप्रशासनसामाजिक पोहोचबाजार हिस्साबाजार भांडवलीकरण आणि ब्रॅण्‍डची योग्यता व प्रभाव यांचा समावेश होतो.

Leave a Reply

%d bloggers like this: