fbpx

Pune Crime : मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट: दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरिक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी-चिंचवड या भागात घडल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात सेक्स रॅकेट सुरू आहे.

उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हा व्यवसाय सुरू आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरू असणा-या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला होता. या प्रकरणी संचालकास अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सात मुलींची सुटका केली आहे. या मुली दुस-या राज्यातून आणल्या गेल्या होत्या.

पोलिसांनी मसाज सेंटर चालवणा-या दोघांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात व्यवस्थापक असलेला उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३२) व संचालक गजानन दत्तात्रेय आडे याचा समावेश आहे. छापा टाकला त्यावेळी पोलिसांनी उत्तम सोमकांबळे याला अटक केली.

पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. कोरेगाव पार्कमधील साऊथ मेन रोडवर हे मसाज सेंटर होते. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून भांडाफोड केला. या ठिकाणावरून पोलिसांनी सात मुलींना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: