युरोकिड्सतर्फे मुलांसाठी वेगवेगळ्या शिफ्ट्ससह नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात
मुंबई : युरोकिड्स या भारतील आघाडीच्या प्री- स्कूल नेटवर्कने नवे शैक्षणिक वर्ष २३- २४ साठी वेगवेगळ्या शिफ्ट्स लाँच करत असल्याचे जाहीर केले आहे. या लाँचच्या मदतीने युरोकिड्सने पालकांना मुलांच्या शिक्षणाबाबत अधिकाधिक लवचिकता आणि पर्याय देण्याचे ध्येय ठेवले आहे. प्री- स्कूलिंगसाठी सकाळी थोड्या उशीरा किंवा दुपारच्या वेळेला प्राधान्य असणारे पालक आणि मुलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिका/इंग्लंड टाइमझोन किंवा कामाचे अपारंपरिक स्वरूप असलेल्या पालकांची सोय करण्याच्या उद्देशाने नव्या शिफ्ट्स तयार करण्यात आल्या आहेत. नर्सरी आणि प्लेग्रुपमधील मुलांसाठी युरोकिड्सतर्फे तीन बॅचेस पुरवण्यात येणार असून त्यात सकाळी लवकरची शिफ्ट, सकाळीच मात्र थोड्या उशीराची शिफ्ट आणि दुपारची शिफ्ट यांचा समावेश असेल. युरोज्युनियर आणि युरोसीनियरसाठी पालकांना सकाळी लवकर किंवा सकाळीच थोड्या उशीरा शिफ्टचा पर्याय असणार आहे.
मुलांना जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी लहान वयात दिले जाणारे महत्त्वाचे झाले आहे. युरोकिड्सद्वारे ईयुनोईया या अभ्यासक्रमाबरोबरच ‘मुलांना प्रथम प्राधान्य’ या तत्वासह मुलांचे मन, शरीर व आत्म्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. युरोकिड्सचा हा अभ्यासक्रम मुलांना एकाग्रता, चिकाटी, दयाळूपणा आणि अशाप्रकारची कौशल्ये शिकवून २१ व्या शतकाशी सुसंगत राहाण्यासाठी मजबूत पाया तयार केला जातो. युरोकिड्स प्रीस्कूलद्वारे ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना दर्जेदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने तयार केलेले प्राथमिक शिक्षण दिले जाते.
वेगवेगळ्या शिफ्ट्सच्या लाँचविषयी प्री- के विभाग, लाइटहाउस लर्निंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही एस शेषशाई म्हणाले, ‘नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होत असतानाच आमच्या १२०० पेक्षा जास्त प्रीस्कूल्समध्ये वेगवेगळ्या शिफ्ट्स उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. ‘शिक्षणाचा नव्याने शोध’ हे कायमच आमच्या कार्यपद्धतींचे केंद्र असते आणि पालक व मुलांसाठी शिक्षण सहजपणे उपलब्ध होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम तयार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मुलांना प्रथम प्राधान्य या तत्वासह युरोकिड्स सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्यावर आणि मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देते. अपारंपरिक शिफ्ट्समध्ये काम करणाऱ्या पालकांच्या सोयीसाठी तसेच मुलांचे जीवनचक्र लक्षात घेऊन हा नवा उपक्रम लाँच करण्यात आला आहे. इच्छुक पालकांना जवळच्या युरोकिड्स केंद्राला भेट देऊन अधिक माहिती घेता येईल.’
युरोकिड्स कायमच प्रत्यक्ष प्रीस्कूल शिक्षणाबरोबर पालक आणि मुलांना गुंतवून ठेवणारे उपक्रम उपलब्ध करण्यात आघाडीवर राहिली आहे. त्याबरोबरच युरोकिड्सने होम बडी अॅप तयार केले आहे. हे अप्लिकेशन वर्गातील शिक्षण घरी करता येणाऱ्या विविध उपक्रमांची मल्टीमीडीया व्हिडिजोज, वर्कशीट्स आणि धोरणात्मक पद्धतीने स्क्रीन टाइमचा वापर करत दैनंदिन संवादाशी सांगड घालते व खेळ, दृश्य आणि कृतीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाला चालना देते. यावर्षी युरोकिड्स २०२२-२३ मध्ये मुलांच्या शिक्षणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व त्यांना २०२३-२४ च्या नव्या शैक्षणिक वर्षात सहजपणे रूळता यावे म्हणून दोन आठवड्यांच्या सेटलिंग पिरेडसह ३६ आठवड्यांचे नियमित शालेय शिक्षण देणार आहे.