Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

ऐसा समा ना होता… स्वर मैफलीने रसिकांनी अनुभवली बहारदार गीतांची जादू

पुणे : गली में आज चांद निकला…कही दूर जब दिन…सारा प्यार तुम्हारा… या हिंदी चित्रपटातील अजरामर गीतांची मोहिनी पुन्हा एकदा रसिकांनी अनुभवली. गायिका प्रज्ञा गौरकर, देवेंद्र पराते , कैलास देसले आणि प्रा.रवींद्र शाळू या कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार नव्या-जुन्या हिंदी गीतांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. गीतांसोबतच दृकश्राव्य माध्यमातून सिनेकलाकारांची छायाचित्रे आणि व्हिडिओ यामुळे ऐसा समा ना होता… या स्वरमैफलीत गीतांची वेगळी जादू पुणेकरांनी अनुभवली.

निमित्त होते, स्वच्छंद पुणे प्रस्तुत आणि प्रतिसाद प्रकाशित ऐसा समा ना होता… या सदाबहार नव्या-जुन्या हिंदी गीतांच्या स्वरमैफलीचे. भीमसेन जोशी नाटयगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवप्रसाद गौरकर, अ‍ॅड.नरेंद्र निखारे , बी.आर.शिंपले, प्रिया लांजेकर, नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जुन्या हिंदी गीतांसोबतच हम आपके है कौन, मैने प्यार किया या अजरामर झालेल्या चित्रपटातील गीते ऐकण्याची संधी देखील रसिकांना मिळाली. कोरा कागज था मन ये मेरा…दिल हुम हुम करे…ये आंखे देख कर… या गायक प्रज्ञा गौरकर आणि प्रा.रवींद्र शाळू यांनी सादर केलेल्या गीतांना विशेष दाद मिळाली. युगुलगीतांसोबतच उडत्या चालीची गीते सादर करणा-या प्रज्ञा गौरकर आणि देवेंद्र पराते यांना देखील टाळ्यांच्या माध्यमातून रसिकांनी साथ दिली.

सन १९०० च्या दशकातील काही कृष्णधवल आणि काही रंगीत चित्रपटातील गीते ऐकताना रसिकांनी त्या काळातील चित्रपट सृष्टीची सफर देखील केली. चित्रपट, गीत, गीतकार, संगीतकार, गायक यांविषयी कार्यक्रमात विविध प्रश्न देखील रसिकांना विचारण्यात आले. रसिक, कलाकार व निवेदक यांच्यात संवाद सातत्याने सुरु असल्याने ही स्वरमैफल अधिकच उत्तरोत्तर रंगत गेली. कार्यक्रमाचे निवेदन सिद्धार्थ यांनी केले. ह्या कार्यक्रमास करोलबाग ग्रुप ऑफ हॉटेल्स, जनरेशन हेंच जिम आणि दापोली हिल्स ग्रुप यांचे  सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन पुष्कर देसले व राहूल गौरकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading