fbpx

गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रा

पुणे : हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात गुढीपाडव्यानिमित्त बुधवार, दिनांक २२ मार्च रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली.

लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, इस्कॉन पुणेचे माधवदास प्रभू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक यांसह श्री गणेश नाथ महाराज संस्थान आषाढी दिंडी क्रमांक १८३ चे वारकरी देखील सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी होतील. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: