fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsNATIONALTOP NEWS

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस

नवी दिल्ली : राहुल यांनी काश्मीरमधील आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान भाषणात बलात्कार झालेल्या काही महिलांचा उल्लेख केला होता. दिल्ली पोलीस थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले व राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. त्याची माहिती घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या नोटीसच्या संदर्भात दिल्ली पोलीस काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे.

सुमारे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दिल्ली पोलिसांना राहुल गांधींची भेट घेता आली. विशेष सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांची राहुल गांधींसोबत बैठक झाली आहे. आम्ही त्यांच्याकडून जी माहिती मागवली आहे, ती ते आमच्याशी शेअर करतील. त्यांना पुन्हा नोटीस देण्यात आली आहे, ही नोटीस त्यांच्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे.

राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पवन खेडा हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र पोलिसांनी आधी त्यांना आत जाण्यापासून रोखले. मात्र, नंतर परवानगी देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. पवन खेडा म्हणाले की, राहुल गांधींना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला काय वाटलं ते घाबरतील? असं खेडा म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: