fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRA

अवकाळी गारपीट नुकसानीचा सॅटेलाईट सर्व्हेच्या आधारे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग करा – राजेंद्र पातोडे.

अकोला – अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यां बाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषिमंत्री अजिबात गंभीर नसून शेतीमालाला भाव नसणे आणि अवकाळी गारपीट पाऊस ह्यात नुकसान झालेल्या शेतकरी ह्यांचे नुकसानीचा सॅटेलाईट सर्व्हेच्या आधारे पूर्ण करून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग करा अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

राज्यात गेले अनेक दिवसांपासून शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने मातीमोल भावात शेतकऱ्यांना आपला शेतमालाला अक्षरशः फेकून देण्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत.त्यावर सरकारी पातळीवर कुठलीही ठोस उपाययोजना होत नाहीय.त्यात एक आठवड्या पासून राज्यात गारपीट, अवकाळी पाऊसामुळे अनेक जिल्ह्यात शेतमालाचे पिकांचे फळे, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसान मुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, ह्यासाठी कुठल्याही प्रकारची यंत्रणा सरकार कडे उपलब्ध नाही, कारण जुनी पेन्शन योजनेचा मुद्द्यावर १८ लाख शासकीय कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी देखील सरकार गंभीर नसल्याने गेली पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कामकाज ठप्प पडले आहे.त्यावर मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ह्या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी पूर्णपणे वाऱ्यावर सोडला आहे.सत्ता पक्षाचा कुठलाही मंत्री आणि आमदार शेतकऱ्यां दिलासा देण्यासाठी उपलब्ध नाही.मुख्यमंत्री उत्तर सभेच्या तयारीत आहेत तर उपमुख्यमंत्री एक कोटीच्या खंडणी प्रकरणात खुलासे करण्यात व्यस्त आहेत.अकोला जिल्हा पालकमंत्री असलेल्या फडणवीस ह्यांनी अकोला जिल्हा पूर्णपणे वा-यावर सोडला आहे.कृषिमंत्री अब्दुल सत्तार नुसते बोलघेवडे असल्याने नुकसान भरपाई बाबत काहीही उपाययोजना करण्यात आली नाही.

सरकारने आपल्या भूमिका बदलुन शेतकऱ्यांना वेळेत आणि ताततीने आर्थिक साहाय्य करण्यासाठी सॅटेलाईट सर्व्हेच्या आधारे सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री ह्यांनी तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: