fbpx

Pune : H3N2 मुळे वृद्धाचा मृत्यू

पुणे : भोसरीतील एका वृध्दाचा एच-3, एच-2 मुळे वायसीएम रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट झाला आहे. तर शहरात चार रूग्ण उपचाराधीन आहेत. भोसरीतील एका 73 वर्षीय पुरुषाला एच-3 एन-2 या विषाणूची लागण झाली होती.

वृद्ध रुग्णाला सात मार्च रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. एच-3 एन-2 या विषाणुचा शहरातील पहिला बळी ठरला आहे. त्यांना या विषाणुबरोबरच हृदयाचा आणि दम्याचाही आजार होता. या विषाणूमुळे आणखी चार रुग्ण शहरात बाधित आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून सर्वजण घरीच उपचार घेत आहेत.

राज्यात इन्फ्लुएन्झा ए या विषाणुचा उपप्रकार असलेल्या एच-3 एन-2 चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खोकला आणि तापाचे रूग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे थंडी आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझा विषाणू आढळून येतो. या इन्फ्लुएनझा विषाणूचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी इन्फ्लुएंझा ए या विषाणूच्या प्रकारामुळे खोकला आणि ताप येत असतो. हा एका विशिष्ट हंगामात दिसणारा विषाणू आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: