fbpx

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा राज्यभर लढा – रमेश बागवे

पुणे : स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे,महात्मा फुले ,लोकमान्य टिळक ,वासुदेव बळवंत फडके या महापुरुषासह कित्येक क्रांतिकारक घडवणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू होत नाही .येत्या अंदाजपत्रकात पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात स्मारकासाठी निधी उपलब्ध करावा तसेच गरीब व वंचित ,घटकातील मुलीसाठी मुक्ता साळवे यांच्या नावे वसतिगृह सुरू करावे यासह मातंग सामजाच्या विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्या अन्यथा राज्यभर मातंग समाजाचा लढा उभारून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी प्रशासनाला व राज्य सरकारला आंदोलनातून इशारा दिला आहे .या आंदोलनाच्या प्रसंगी बागवे बोलत होते
या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे , राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष विजय डाकले,शिवसेना नेते बाळासाहेब भांडे ,राज्य समन्वयक विठ्ठल थोरात , सुरेखा खंडाळे ,महिला शहराध्यक्ष राजश्री अडसूळ , अंकल सोनवणे ,मधुकर चांदणे ,विनोद शिंदे ,अॅड . एकनाथ सुगावकर यासह पुणे शहरातील महिला युवक व मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: