कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला गोशाळेची भूरळ
मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणासह उत्तर भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये प्रमुख आरोपी असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने आज थेट तुरूंगातून मुलाखत दिली. यावेळी त्याने सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणात मोठे खुलासे तर केलेच. शिवाय सलमान खानला दिलेली धमकी, गॅंगवॉर, तुरूंगातील प्रशासन व इतर अनेक विषयांवर गौप्यस्फोट केले. यावेळी तुरुंगातून सुटल्यावर तू काय करशील ? या प्रश्नावर उत्तर देताना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने गोशाळा चालवण्याचा मानस असल्याचे व्यक्त केले.
एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, मी कोणी आतंकवादी नाही. किंवा मोठा गँगस्टरही नाही. स्वतःच्या नियमांवर चालणारा एक बिश्नोई समाजाचा सामान्य नागरिक आहे. मी ज्या वातावरणात राहिलो. वाढलो त्याचा आमच्यावर प्रभाव आहे. आमच्यात जीवाहत्या करीत नाही. म्हणून मी नॉनव्हेज खात नाही. मी विद्यार्थी होतो तेव्हा हॉस्टेल मधून थेट तुरूंगात आलो आहे. गेल्या नऊ वर्षा पासून मी तुरूंगात असून बाहेरच्या जगाशी माझा थेट संपर्क ही नाही. मात्र जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा मी गोशाळा चालावणार आहे. माझा भाऊ सध्या हेच काम करीत आहे, असेही त्याने नमूद केले.