कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या ओळी वगळायला लावणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा साहित्यिकांकडून निषेध
उर्मिला पवार, सुबोध मोरे, अजय कांडर, श्रीधर पवार, गणेश विसपुते, आशालता कांबळे, नीरजा, प्रज्ञा पवार आदींसह ५० साहित्यिकांनी निषेध नोंदवला
– नाटककार विजय गायकवाड यांच्या नाटकाला सेन्सॉर बोर्डचा आक्षेप
पुणे : सुप्रसिद्ध दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या” जाहिरनामा” या संग्रहातील ” शीगवाला ” या गाजलेल्या कवितेतील काही ओळी या जातीवाचक आहेत असा आरोप मराठी नाट्य सेन्सॉर बोर्डने केला आहे.त्यामुळे त्या नाटकातून वगळण्यात याव्यात अशीही सूचना नाट्य सेन्सॉर बोर्ड केला असून या घटनेचा साहित्यिकांनी निषेध केला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी या घटनेचा निषेध करावा असेही आवाहन सदर साहित्यिकांनी केले आहे.
सदर कवितेच्या ओळी, पुण्यातील नाटककार विजय गायकवाड यांनी नाटकातून वगळाव्या असा मूर्खपणाचा सल्ला सेन्सॉर बोर्डने नाटककाराला दिला आहे.
निषेध करणाऱ्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, राकेश वानखेडे,मुख्तार खान, डॉ श्रीधर पवार, गणेश विसपुते, अजय कांडर, सुरेश राघव, अविनाश कदम, प्रज्ञा दया पवार, सुभाष थोरात, छाया कोरेगावकर, संजय भिसे, चारूल जोशी,रमन मिश्र, प्रमोद नवार,निरजा,कुंदा प्र. नी.१l अविनाश गायकवाड, कविता मोरवणकर, आनंद विंगकर, शोभा बागुल, शैलेश सिंग, राकेश शर्मा, डॉ प्रतिभा अहिरे,डॉ माया पंडित, सुरेश साबळे, सारिका उबाळे-परळकर, डॉ आदिनाथ इंगोले,डॉ वंदना सोनाळकर, राजानंद सुरडकर, राजू देसले, शिवराम सुखी, सुनील कदम, धम्मा रणदिवे, राजू रोटे, जयवंत हिरे, शाहीर निशांत शेख, शाहीर सुरेंद्र बर्वे, प्रसाद सावंत, संजय खिलारी, उर्मी, प्रभू राजगडकर, डॉ महेबूब सय्यद, राजीव देशपांडे , डॉ आशालता कांबळे,मधुकर मातोंडकर, धुरंधर मिठबावकर, हिरा बनसोड, विनिषा धामणकर सायमन,मार्टिन, जुल्मिरामसिंग यादव, विनित तिवारी, उषा आठल्ये आदींचा समावेश आहे.
सदर कवितेच्या ओळींवर आक्षेप घेणाऱ्या महाराष्ट्रातील बथ्थड नाट्य सेन्सॉर बोर्ड सदस्यांचा लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, जनवादी लेखक संघ व प्रगतिशील लेखक संघही तीव्र निषेध करीत आहे. तसेच लोकशाही व संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या इतर सर्व संवेदनशील लेखक, दिग्दर्शक,कलावंतांनीही शासनाच्या नाट्य परिक्षण मंडळातील मुस्कटदाबी करणाऱ्या सदस्यांचा जाहीर निषेध करावा असेही आवाहन वरील लेखक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.